Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

वाचा काळी हळद आणि हळदीच्या ७ प्रकारांबद्दल माहिती !

 काळी हळद
हळदीचे काही प्रकार आहेत त्यात काळी हळद हा एक प्रकार आहे. मार्केट मध्ये काळ्या हळदीच्या नावाने काहीपण दिले जाते आणि पैशे उकळले जातात त्यापासून लांब राहणे. काळी हळद वशीकरण, कोर्ट केसेस मध्ये विजय, राजकारण मध्ये विजय, भूत बाधेपासून सुटका करून घेण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्ती साठी उपयोगात आणली जाते. काळ्या हळदीचे रोप हे कण्हेरीच्या झाडासारखे असते परंतु फरक हा असतो की काळ्या हळदीच्या पानावर मध्यभागी काळ्या रंगाची रेष असते. काळी हळद सहजा सहजी मिळत नाही. सर्वात उत्तम प्रतीची काळी हळद अमरकंटक, मध्यप्रदेश येथे मिळते तसेच कामाख्या मंदिराच्या आसपास मीळते. काळी हळद ओळखता आली पाहिजे नाहीतर काळी हळद सांगून आंबेहळद पण दिली जाते. काळ्या हळदीच्या झाडाचे मूळ कामासाठी वापरले जाते. मूळ कापले असता आतमध्ये काळा भाग असतो. हळदीचे ७ प्रकार आहेत त्यात एक प्रकार काळी हळद म्हणून प्रचलित आहे.

हळदीचे ७ प्रकार....

१. पांढरी हळद... ही आतून पांढऱ्या रंगाची असते आणि इतर हळदीच्या जोडीला ही वापरतात.

२. जांभळी... हीचे मूळ आतून जांभळे असते आणि पानावर जांभळा पट्टा म्हणजे रेष आलेली असते.

३. कुकवी... ही कुंकवासारखी लालसर असते. हिची ओळख म्हणजे हिच्या मुळाने कागदावर रेष मारली असता लाल रेष उमटते. हि खूप शक्तिशाली मानली जाते. हि धनप्राप्ती साठी पण वापरली जाते.

४. पिवळी... हि आतून पिवळी असते. हि वाशिकरणासाठी वापरली जाते.

५. शेंदरी... हि आतून शेंदरा सारखी असते. हि पतिपत्नी मध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी वापरता येऊ शकते.

६. काळी.. हि सर्वात शक्तिशाली हळद असते. हि खूपच दुर्लभ असून खूप खोल जंगलातच मिळू शकते. हिचे ५० ते १०० ग्राम वजनाचे मूळ ५० लाखाच्या आसपास जाऊ शकते. आणि ज्याच्या नशिबात असेल त्यालाच ती मिळू शकते. हिच्या आसपास रक्षण करण्यासाठी कोब्रा नाग असतात. हिची ओळख पटवणे आणि हिला काढणे ह्याचे काही प्रकार आहेत ते मी नंतर कधीतरी सांगेन.

७. साधी हळद... हि जेवणात वापरली जाते.

सदर लेख हा ऍडव्होकेट अंकुश नवघरे ह्यांचा आहे आणि त्यांचा कॉपीराईट आहे जो मराठी-फीड वेबसाईटने त्यांच्या परवानगीने प्रसिद्ध केला आहे. सदर लेख त्यांच्या पूर्व परवानगीने वापरु नये, धन्यवाद