Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

कसा असावा सरपंच - कसा नसावा सरपंच !

 
सरपंच म्हणजे कुठल्याही गावाचा मानबिंदू.  गाव म्हणजे एक रथ आणि सरपंच जणू काही त्या रथाचा सारथी! प्रत्येक गावाचे राजकारण असो नाही तर समाजकारण असो त्याची सुरुवात आणि शेवट हा ज्या व्यक्तीच्या पाशी होतो ती व्यक्ती म्हणजे सरपंच. प्रगत गावांमध्ये तर लाखो रुपये खर्च केले जातात सरपंच बनायला पण तो कसा असावा ह्याचा विचार आपण काही केला आहे का ? नसेल तर तो नक्कीच केला पाहिजे
असा असावा सरपंच 
➡ समाजसेवेची आवड असणारा असावा.
➡ विकास हेच ध्येय मानणारा असावा .
➡ सर्व समाज समभाव मानणारा असावा.
➡ प्रत्येक कार्यक्रमात मीच झेंडा वंदन करणार असे म्हणणारा नसावा.
➡ ग्रामसेवकाचा पाठिराखा असावा.
➡ घरकूल,गोठा,शोषखड्डा,फळबाग, शेततळी,सिंचन विहिर,शिलाई मशिन दुधाळ जनावरे, कुक्कूट पालन अशा अनेक योजनांचे आमीष दाखवून लोकांकडून शे-पाचशे रूपये उकळणारा नसावा.
➡ रोज एका युवकाला पार्टी देऊन व्यसनाला लावणारा नसावा.
➡ तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात दबदबा असलेला असावा.
➡ पक्षपात करणारा नसावा.
➡ विरोधकांना सामावून घेणारा असावा.
➡ शासकीय योजना लोकार्पण करणारा असावा.
➡ शासकीय विविध योजना आणणारा असावा...
➡ आयत्या पिठावर रेगोट्या ओढणारा नसावा.
➡ स्वतःच्या कानाचा असावा.
➡ दुस-याच्या कामाचे श्रेय स्वत: न घेणारा नसावा.
➡ गावच्या विकासाचे ठराव विनाविलंब करणारा नसावा.
➡ अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा असावा.
➡ प्रकरणाचे भांडवल करून दिशाभुल करणारा नसावा.
➡ शासकीय कामांची ठेकेदारी न करता दर्जा राखणारा असावा.
➡ सभापती,जि.प.सदस्य,आमदार,खासदार यांच्या सतत संपर्कात राहणारा असावा.
➡ एकदा पाच वर्षे सरपंचपद भोगून पुन्हा मीच सरपंच होणार म्हणणारा नसावा.
➡ युवकांन/महिलांना संधी देणारा असावा.
➡ शेवटी काय सुशिक्षित व सक्षम असावा.
 ग्रामस्थांनो ..... जर का वरील गुण तुमच्या सरपंचात दिसले नाहीत तर तुमच्या गावाच्या विकासाला खिळ बसलीच समजा.