Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

ह्या पुढे केकने सेलिब्रेट करतांना हि काळजी घ्या बघा का फायर कॅण्डल हानिकारक आहे !


केक म्हणजे आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे. फक्त जन्मदिवसचं नाही तर लग्नाचा वाढदिवस,एखादी इव्हेन्ट घडतांना, नवीन प्रोजेक्ट सुरु करतांना प्रत्येक प्रसंगी आजकाल केक कापलाच जातो आणि केक आला तर त्यावर मेणबत्ती आलीच कि !
पण आजकाल मेणबत्तीची जागा घेतली आहे ती फायर कॅण्डल [Fire Candle] ने, जवळ पास आपण सर्वच हि फायर कॅण्डल वापरूनच केक कापण्याचा कार्यक्रम करतो !
ह्यावरच एक प्रयोग करण्यात आला आहे. प्रयोग खूपच सोपा आहे, तो तुम्ही घरी पण करू शकतात. त्या साठी खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे तुम्ही एका रबर पॅड वर हातामध्ये फायर कॅण्डल पकडून तिला जाळले असता

cake fire candle 

कॅण्डल पूर्ण पणे जळाल्यावर तुम्हाला खालील गोष्टींचे निरीक्षण करावे लागेल.  कॅण्डल पूर्ण जळाली कि काळजीपूर्वक तुम्ही रबर पॅड वरती साचलेली एक बारीकशी भुकटी गोळा करा. हि भुकटी म्हणजे फायर कॅण्डल मधून फटाक्याची दारू आहे. खालच्या फोटोत तुम्ही बघू शकतात कि किती फटाक्याची एका फायर कॅण्डल मधून बाहेर पडते. जो केक तुम्ही नंतर मिटक्या मारत खातात त्यावर हि दारू सांडत असणार आणि केकच्या वाटे तुमच्या पोटात ती जाणार !


हि फटाक्याची दारू अत्यंत हानिकारक असते, लहान मुलांना ह्याच्याने त्रास होऊ शकतो. पोट बिघडणे, गळ्यात जळजळ होणे ह्या शिवाय ह्या मध्ये असलेले जड धातू आणि कार्बाईडस शरीराला हानी पोहोचवू शकतात. तरी ह्या नंतर तुम्ही फायर कॅण्डल वापरतांना नक्की विचार कराल हि आशा बाळगतो !