Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मुंबई विमातळावर २४ तासात विक्रमी ९६९ विमानांचे आवागमन (Landing and Takeoff)

Mumbai Airport Traffic

भारताची आर्थिक राजधानी मुंबई चे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील अतिशय व्यस्त असे विमानतळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातच एकाच धावपट्टीचा वापर करणारे हे जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. मुंबई विमातळावरील धावपट्टीवरून २००६ पर्यंत एका तासात जवळपास ३० विमाने ये-जा करत असत. परंतु भारतातील हवाई प्रवासाची वाढलेली संख्या, आर्थिक विकासामुळे वाढलेली परदेशी नागरिक आणि पर्यटकांची वाढलेली संख्या आणि तसेच भारतात छोट्या शहरात विमानसेवा सुरु झाल्याने नवीन हवाईमार्ग यामुळे मुंबई मधील विमानांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

यापूर्वी मुंबई धावपट्टीवरून २४ तासात ८५२ विमानांचे आवागमन झाले होते. परंतु २४ आणि २५ नोव्हेंबर च्या दरम्यात २४ तासात मुंबई मधून विक्रमी ९६९ विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ झाले. यामुळे जगातील सर्वाधिक वर्दळ असेल धावपट्टी असलेल्या मुंबईने अजून एक विक्रम मोडला आहे. अर्थात या विक्रमामागे हवाई नियंत्रण कक्षातील नियंत्रकांचे काटेकोर नियोजन व विमानतळाच्या सर्व यंत्रणांचा समन्वय याचे  फार मोठे योगदान आहे.
हे जरी असले तरी आता मुंबईसाठी अजून एका विमानतळाची गरज असून ते लवकरात लवकर पूर्णकरून व्यवस्थेवरचा ताण कमी करणे गरजेचे आहे.

Air plane Landing


नवीमुंबई मध्ये पनवेल जवळ होऊ घातलेले नवीन विमानतळ वेगाने पूर्ण करणे गरजेचे आहेच तसेच मुंबईपासून अवघ्या १८० किमी असलेले नाशिक येथील विमानतळ सुद्धा मुंबई मधील हवाईवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उपयोगी पडू शकते. सरकारने यावर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे जेणेकरून काही मोठा अपघात होण्यापासून बचाव करता येईल. आज छोट्या शहरांमध्ये विमानसेवा सुरु केल्यास मुंबई सारख्या विमानतळावरील भार काही प्रमाणात कमी करण्यास नक्कीच मदत मिळेल.