Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

तर 'दशक्रिया' चित्रपट रिलीज होऊ देणार नाही - अखिल भारतीय ब्राम्हण संघटना

सध्या येणारे जे चित्रपट येत आहे प्रदर्शित होण्याच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहेत . मागे आपण पद्मावतीच्या वादाबद्दल ऐकत होतो . तो वाद अजूनही पूर्णपणे चिघळलेला नाही . तोच अजून एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे . तो पण एक मराठी चितपट आहे आणि त्याचे नाव आहे  दशक्रिया .दशक्रिया हा मराठी चित्रपट ब्राम्हण आणि हिंदू समाजाच्या रूढी आणि परंपरांना बदनाम करणारा आहे त्यामुळे या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राम्हण संघटनांनी केली होती . त्यामुळे मुंबई व पुण्यातील काही चित्रपटगृहांनी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे . हा चित्रपट १७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार होता . या चित्रपटाचे सहनिर्माते निल कोठारी यांनी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना पत्राद्वारे अशी विनंती केली आहे कि या चित्रपटाला पोलीस संरक्षण द्यावे .

या चित्रपटावर बंदी आणावी यासाठी मागणी करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे . आज या याचिकेवर निकाल सुनावला जाणार आहे . प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड यांचे १९९४ मधील दशक्रिया या कादंबरीवर हा चित्रपट बनवला गेलेला आहे . त्याला ३ राष्ट्रीय पुरस्कार  आणि ११ राज्य पुरस्कार देखील मिळाले आहेत .

पैठण येथील पुरोहितांच्या याचिकेनुसार, कादंबरीत नसलेल्या गोष्टीही चित्रपटात चित्रित आहेत. घटनेनुसार धार्मिक स्वातंत्र्य व व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार आहेत. गरुडपुराण, निर्णयसंहिता, धर्मसिंधू, अंत्येष्टी संस्कार आदी ग्रंथांत याबाबत लिहिलेले आहे. हे थोतांड नसून हिंदू संस्कृती व परंपरेने चालत आलेला विधी आहे. पैठण शहर व काही ठिकाणांबद्दलही चित्रपटात आक्षेपार्ह केलेले आहे.

 निर्मात्यांचे म्हणणे आहे कि सेन्सॉरशिपकडून लेखक आणि कलाकारांची मुस्कटदाबी आहे . दशक्रिया हा कोणत्याही एका समाजाबद्दल भाष्य करणारा चित्रपट नाही तर तो कर्मकांडाच्या नावाखाली भोळ्या भाबड्या लोकांचे कशा प्रकारे शोषण केले जाते ही सत्य परिस्थिती या चित्रपटात दाखवली गेली आहे असे निर्मात्यांचे म्हणणे आहे .