Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

राज ठाकरेंनी माझे १ मत गमावले - नाना पाटेकर


 

मागच्या काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर आणि राज ठाकरे ह्यांच्या मध्ये शाब्दिक चकमकी उडाल्याचे आपण पहिलेच. राज ठाकरे म्हणाले होते कि  'महात्मा नाना पाटेकर आज काहीतरी बोललेत ? नाना पाटेकर बोलताना 80 वर्षाच्या आजोबांचा एक टोन असतो' तसेच 'वेलकममध्ये भाजी विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहे', अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली.

'नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावं. नाना पाटेकर मराठीतला उत्तम कलावंत आहे, तुमचे चित्रपट बघू...पण नको त्या गोष्टीत पडू नका', असे देखील राज बोलले होते .. नानाची केलेली नक्कल आणि त्यांना सूडावलेले खडे बोल ह्याचा परिणाम कि काय आज पुण्यात बोलतांना नाना पाटेकर ह्यांनी ह्या सर्व घटनेवर परत एकदा आपले मत व्यक्त केले.
'राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला होता आणि मी माझा. प्रत्येकाला बोलण्याचा, मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं', असं नाना पाटेकर बोलले आहेत.

'मला काल कोणीतरी विचारलं की, फेरीवाल्यांना असं रस्त्यावरुन हुसकावून लावणं, मारणं योग्य आहे का ? माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. अतिक्रमण नसावं वैगेरे सगळं मान्य आहे. माझी एक साधी वृत्ती अशी आहे की, मी जर माझ्या दोनवेळच्या भाकरीसाठी आज काम करत असेन, आणि ते काम मला नसेल तर मग काय मी काय करेन, तुम्ही खात असाल तर तुमच्या हातचं हिसकावून घेईन. त्यामुळे मला काम करु द्या. यात फेरीवाल्यांची काही चूक नाही. चूक तुमची आमची आहे. इतकी वर्ष का नाही कार्पोरेशननं डिमार्केशन केलेली ? आपण कॉर्पोरेशनला विचारलं का ?'असे आज नानाने पुण्यात मत मांडले.

गरीब बिचाऱ्या फेरीवाल्यांची काहीही चूक नाही, प्रत्येकाला पोट भरण्याचा अधिकार असल्याचं  देखील मागे नाना पाटेकर बोलले होते आणि फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर असताना आणि मनसे त्यावर आक्रमक असतानांच नाना पाटेकर ह्यांनी फेरीवाल्यांची बाजू लावून धरल्याने हे सर्व वाकयुद्ध घडल्याचे समोर आलेले. त्याचेच पुढचे चरण म्हणून कि काय आज नाना ह्यांनी जुना मुद्दा परत उकरून काढला असावा असा अंदाज आहे. ह्यावर राज ह्यांची प्रतिक्रिया येणार हे नक्की ..