Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा का म्हणून राणेंचा पत्ता केला मुख्यमंत्र्यांनी साफ !


शिवसेने मधून बाळासाहेब ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेस शी घरोबा केला होता. परंतु तिथे सुद्धा राणेंच्या महत्वकांक्षेला शांत करेल असे झाले नाही. राणे नेहमीच मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असल्यामुळे काँग्रेस मध्ये सुद्धा वारंवार बंडाची भाषा केली. याचा विपरीत परिणाम होत १० जनपथ मध्ये राणेंची किंमत शून्य झाली. सोनिया आणि राहुल गांधींच्या दरबारात राणे अडगळीला पडल्यासारखी अवस्था झाली. यामुळेच व्यथित होत राणेंनी शेवटी काँग्रेस ला राम राम ठोकत नवीन पक्षाची घोषणा केली. 

वास्तविक भाजपा मध्ये राणे प्रवेश करणार असे जवळपस निश्चित मानले जात होते. परंतु जुन्या जाणत्या लोकांच्या विरोधामुळे राणेंचा भाजपा प्रवेश हुकला आणि राणेंना अनिच्छेने नवीन पक्ष काढावा लागला. काँग्रेस च्या कोट्यातून मिळालेली विधानपरिषद आमदारकी सुद्धा सोडावी लागली. राणेंना आशा होती कि सरकार मध्ये मंत्रिपदाची शपथ लवकरच मिळेल परंतु भाजपा मध्ये अजूनही राणे विषय चिंतन पूर्ण झाले नाही अशी अवस्था आहे. त्यातच राणे पितापुत्राने गुजराथी समाजाबद्दल उधळलेली मुक्ताफळे भाजपासाठी अडचणीची होऊ शकतात. म्हणूनच गुजरात निवडणुकीपर्यंत तरी राणे मंत्री होणार नाहीत असे चित्र आहे.

यातच अजून मोठा धक्का म्हणजे राणेंनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपा ने शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले राष्ट्रवादीतून भाजपात उडी मारलेले आणि मुख्यमंत्री फडवणीस यांचे निकटवर्तीय "प्रसाद लाड" याना उमेदवारी जाहीर केली आहे. वास्तविक माधव भंडारी यांना डावलून प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपा मध्ये सुद्धा नाराजी आहेच.  पण ज्या भाजपच्या भरवश्यावर राणेंनी आपला राजकीय जीवनाचा सर्वात मोठा जुगार खेळला त्या भाजपने सुद्धा राणेंना झुलवत ठेवले आहे. विधान परिषद उमेदवारी मुळे पुन्हा एकदा ठेंगा दाखविला आहे. एकूणच बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेलेल्या राणेंची राजकीय परिस्थिती बरीच बोलकी आहे.