Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मराठी व्यावसायिकाच्या मदतीला धावून आले राज ठाकरे !

 मराठी व्यावसायिकाच्या मदतीला धावून आले राज ठाकरे
प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी हे सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. गेली ४० वर्षे मेहतीने उभा केलेला त्यांचा व्यवसाय गेले २ वर्ष झाले आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. 'घराला घरपण देणारी माणसे' हि ओळ हाताशी धरून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांचे भांडवल सोबत घेत डीएसके गेली २० वर्षांपासून मोठ्या झेप घेत आहे पण २०१७ मध्ये त्यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहेत. त्यांच्या कडे पैसे दिलेल्या लोकांना ते त्यांचे पैसे आणि व्याज गेले काही महिने देउ नाही शकले आहेत. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्या कडे प्रचंड मालमत्ता आहे पण पैश्याच्या चलनाचा सध्या अभाव आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असून ह्यातून ते लवकरच बाहेर पडतील असा आत्मविश्वास देखील दाखवला आहे. दरम्यात ह्या काळात निर्माण झालेल्या अविश्वाच्या वातावरणाला थोपवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे आज पुण्यात सर्व ठेवीदारांशी संभाषण करत आहे.

‘आय सपोर्ट डीएसके’ असे या चर्चेला नाव देण्यात आले असून लॉ कॉलेज रोडवरील दरोडे सभागृहात सध्या ही चर्चा घडली आहे. पुणे, मुंबई आणि कोल्हापुर येथे गुंतवणुकदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत. सुमारे ३५०० एफडी धारकांनी आपल्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केल्या आहेत. गुंतवणूकदारांचे सुमारे २०० कोटी रुपये या प्रकरणात अडकले आहेत.
राज ठाकरेंनी ह्या प्रकरणा मध्ये एक हमीदाराची भूमिका निभावली डीएसके नक्कीच ह्यातून बाहेर पडतील ह्यात शंका नाही. मराठी व्यावसायिकाच्या मदतीला राजकीय चौकाटीतुन बाहेर पडून मदत करण्याच्या राजसाहेबांच्या ह्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.