Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

तर मला एक खून करण्याची परवानगी द्याच !! - राजसाहेब ठाकरे

 
आजच्या तंत्र युगात मोबाईल हि काळाची गरज बनली आहे . त्याचे जसे फायदे आहे आहेत तसे दुष्परिणामदेखील आहेत . आजच्या युवापिढीला सध्या वेड लागले आहे ते म्हणजे सेल्फी काढण्याचे.

याचा त्रास काही सेलिब्रेटींना होऊ लागला आहे एकंदर त्यांचा डोक्याला ताप झाला आहे . त्यातील एक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांना .

राज ठाकरे यांचे म्हणणे आहे कि त्यांना भेटायला येणारे जे लोक असतात ते मुद्याचं बोलायचं सोडून आधी फोन खिशातून काढून सेल्फी घेत बसतात. त्यामुळे कामा बाजूला राहून जातात . त्यामुळे राज ठाकरे यांचा सेल्फी काढणाऱ्यांवर अतिशय राग येतो . त्यामुळे राज ठाकरे म्हणाले आहेत कि मी जेव्हा राष्ट्रपतींची भेट घेण्यास जाईल तेव्हा मी त्यांना एक विंनंती करणार आहे कि मला एक खून माफ करण्याची परवानगी द्यावी असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे .

राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत . ते नाशिकमधील मनसे कारकर्त्यांशी संवाद साधत आहेत आणि त्यांना मार्गदर्शनदेखील करत आहेत . त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांचा कारकर्त्यांना आणि मीडियाला त्याची जाणीव करून दिली . ते म्हणाले कि मी बाहेर जाताना कोणीच माझे फोटो काढायला यायचे नाही आणि सेल्फी काढायला तर अजिबात नाही असा त्यांनी खडसावून सांगितले. त्यावेळेला राज ठाकरे हेदेखील म्हणाले कि ज्या माणसाने मोबाईल कॅमेऱ्याचा शोध लावला आहे मी त्याचा खून करणार आहे असे तेव्हा ते म्हणाले, अर्थातच ते मिश्कीलपणे म्हणाले होते पण तेव्हा सर्व कारकर्त्यांनी लगेच त्यांचे मोबाईल खिशात ठेवून दिले .