Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

रजनीकांत माणूस म्हणून कसा आहे ? - जाणून घेयला हे वाचावेच लागेल ..

 

रजनीकांत माणूस म्हणून कसा आहे हे सांगणारी, ही कदाचित खरी, कदाचित जास्त रंगवलेली गोष्ट..
काही वर्षांपूर्वी म्हैसूरला शूटिंग करत होतो. आमचा प्रोडक्शन मॅनेजर CVK SHASTRI नावाचा होता. त्याने काही रजनीचे चित्रपट केले होते. त्याने सांगितलेली ही गोष्ट..
रजनी जेव्हा बस कंडक्टर म्हणून काम करायचा त्यावेळी त्याच्या चित्रपटाच्या नादापायी अनेक वेळा त्याला ड्युटीवर जायला उशीर व्हायचा, दांड्या पडायच्या.. पण त्याचा जो साहेब होता तो या सगळ्याकडे जमेल तितक दुर्लक्ष्य करून रजनीला सांभाळून घ्यायचा.. पुढे जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या तेव्हा त्याने रजनीला सांगितलं की "बाबा तू आता नोकरी सोड, नाहीतर माझी नोकरी जाईल!" रजनीने पण समजून नोकरी सोडली..
काही वर्षानंतर तो आज जे आहे ते म्हणजे सुपरस्टार झाला..
नंतर बऱ्याच वर्षांनी एकदा त्या साहेबाच्या गावात तो शूटिंग साठी गेला असताना त्याला पूर्वीची आठवण आली आणि रात्री शूटिंग संपल्यावर, तो पत्ता शोधून साहेबाला भेटायला गेला.साहेब बिचारा कानकोंडला झाला.. हा मोठा सुपर स्टार झालेला..
पण पूर्वी इतक्याच साधेपणाने, आदराने बोलत होता.. साहेबाच्या मुलीचं लग्न ठरत होतं. हे समजल्यावर रजनीने त्याला 'काय वाट्टेल ती मदत सांगा' असे सांगितले.  साहेब म्हणाला 'मला तुझी काय मदत लागणार? आम्ही साधी माणसं बाबा, तू एव्हडा मोठा माणूस.. तू ओळख ठेवलीस हेच खूप आहे आमच्या साठी!'..
तिथून परत येताना रजनीने प्रॉडक्शनच्या माणसाला मुलीच्या मुलाकडचे लोक बघायला येण्याची तारीख विचारून घेतली..
ठरलेल्या दिवशी मुलाकडचे सगळे साहेबाच्या घरी मुलगी बघायला आले.. कार्यक्रमाला सुरवात झाली आणि स्वयंपाक घरातून स्वतः रजनीने पाहुण्यांसाठी चहाचा ट्रे घेऊन एंट्री घेतली .. समोरचे फक्त बेशुद्ध पडायचे बाकी राहिले होते..  दक्षिणेत अजूनही बऱ्याच परंपरा, खर्चिक लग्न, हुंडा हे चालतं.. एका क्षणात हे सगळं टाळून मुलीचं लग्न जमलं.. रजनीने जाताना मुलीच्या हातात ५ लाख रुपयांचा चेक दिला आणि मुला कडच्यांना सांगितलं की "काहीही लागलं तरी हिच्या वडिलांच्या आधी मला कळवायचं.."
रजनीचे किती तरी असे किस्से त्याने सांगितले..
हे जर खरे असतील तर ह्या स्टारला माणूस म्हणून साष्टांग नमस्कार घालावा !!!
-unknown
पोस्ट आवडल्यास नक्की लाईक करुन शेअर करा.