Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बापरे बघा राखी सावंतचे खरे नाव काहीतरी वेगळेच आहे - आज तिचा वाढदिवस !

 
२५ नोव्हेंबर आज अभिनेत्री आणि नृत्यांगना राखी सावंतचा वाढदिवस ...
जन्म. २५ नोव्हेंबर १९७८ रोजी जन्मलेल्या राखीने आपल्या अभिनयाने आणि नृत्याच्या कौशल्याने बॉलिवूड मध्ये आणि देशामध्ये आपले नावलौकिक मिळवला.
कॉलेजचा अभ्यास पुर्ण करुन तिने मॉडलिंग सुरु केली. यानंतर तिने अग्निचक्र फिल्ममधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर कुरुक्षेत्र, जोरू का गुलाम,जिस देश मे गंगा रेहता हे, गौतम-गोविंदा,दम,मे हू ना, ना तुम जानो ना हम, दिल बोले हड्डीप्पा अश्या अनेक नावाजलेल्या चित्रपटांमध्ये आपण तिला पहिले आहे . सातच्या आत घरात सारख्या मराठी चित्रपटांमधून पण आपण राखीच्या अभिनयाची जादू बघितली आहे.
वादांची मल्लिका म्हणून राखी सावंत प्रसिद्ध आहे ... 
राखी सावंत आणि वाद ह्यांचे जुने नाते आहे. २००६ मध्ये मिका सिंग ने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टी मध्ये राखीचे चुंबन घेऊन मोठा वाद ओढवून घेतला होता .. हे प्रकरण अजूनही मीडियामध्ये चर्चिले जाते. तिने टीव्हीवर आपले स्वयंवरसुध्दा केले होते. त्यानंतर तिचा विजेयी स्पर्धका सोबत साखर पुडा देखील झालेला पण लग्न काही झाले नाही राखी 'बिग बॉस'च्या पहिल्या पर्वा दरम्यान स्पर्धक अमित साधसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती.
निवडणूक देखील लढवली  ...
२०१४ साली तिने लोकसभा निवडणूक लढवून राजकारणामध्ये पण दमदार एंट्री घेतलेली. तेव्हा हिरवी मिरची हे तिचे निवडणूक चिन्ह होते जे निकालानंतर हिरवेगार पडले.
पण जिला आपण राखी सावंत म्हणून ओळखतो तिचे खरे नाव मात्र वेगळेच आहे !
काय आहे राखीचे खरे नाव जाणून आश्चर्य होईल ...
राखी सावंतचे खरे नाव नीरु भेदा आहे. बसला ना झटका ? राखीच्या आईचे नाव आहे जया भेदा आणि त्यांच्या पहिल्या लग्नापासून राखीचा जन्म आहे. त्यांनी नंतर आनंद सावंत ह्यांच्याशी लग्न केले आणि म्हणून निरू भेदाची झाली राखी सावंत.