Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

एके काळचा महाखलनायक! बघा कशी आणि का झाली हि अवस्था ?

 
रम्मी रेड्डी हे नाव  नेहमीच कधी न विसरता येणार नाव आहे बॉलीवूड मध्ये . रम्मी रेड्डी यांनी बॉलीवूड आणि साऊथ इंडियन चित्रपट अशा दोन्ही क्षेत्रात २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली आहे . त्यातील काही तर अतिशय अविस्मरणीय आहे . खास करून नकारात्मक भूमिका जास्त लोकप्रिय आहेत . त्यांची सर्वात जास्त बॉलीवूड मधील गाजलेली भूमिका म्हणजे चिंकारा ची चित्रपट वक्त हमारा है मधील . त्यानंतर प्रतिरोधमधील अण्णा या भूमिकेला सुद्धा लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते . दिग्दर्शकांचा पण तो आवडता खलनायक बनला होता .
पण या कलाकाराला खऱ्या आयुष्यात  खूप कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला होता . त्यांच्या किडनीला आजार झाला होता .

रम्मी रेड्डी यांचा जन्म १ जानेवारी १९५९ रोजी आंध्र प्रदेशमधील चितूर जिल्ह्यातील  वाल्मिकीपुरम या छोट्याशा गावात झाला होता . ओस्मानिया विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली . चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी रम्मी हे मुन्सिफ डेली नावाच्या वर्तमानपत्रसाठी पत्रकाराचे काम करत होते . रम्मी रेड्डी यांनी सर्वात पहिला तेलगू चित्रपट  केला होता . त्या चित्रपटाचे नाव अंकुशम असे होते . हा चित्रपट १९९० साली प्रदर्शित झाला होता . या चित्रपटातील स्पॉट नाना हे त्यांचं पात्र खूप गाजलं . या पात्राने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली .

या प्रसिद्धीमुळे त्यांना बॉलीवूड मध्ये सहज प्रवेश मिळाला . त्यांचा पहिला बॉलीवूड चित्रपट म्हणजे प्रतिबंध . यामध्ये सुद्धा त्यांचा अण्णा ह्या पात्राने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे बॉलीवूड मध्ये त्यांची स्वतःची एक ओळख निर्माण झाली . त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले . त्यानंतर काही दिवसांनी त्यांची तब्येत खालावली . त्यामुळे ते त्यांचा बहुतेक वेळ कुटुंबासोबत घालवायला लागले .

अचानक अशी घटना घडली कि त्यांना धक्काच बसला . डॉक्टरांनी सांगितलं कि त्यांना किडनीचा आजार गंभीर आजार झाला आहे . त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची तब्येत बिघडत गेली . त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .

बऱ्याच महिन्यांच्या उपचारानंतर रम्मी रेड्डी हे त्यांच्या आजाराशी लढा नाही देऊ शकले . त्यामुळे १४ एप्रिल २०११ ला त्यांनी या जगात शेवटचा श्वास घेतला . रम्मी रेड्डी हे सर्वांचेच आवडते खलनायक होते .