Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा कसा राजेशाही थाट आहे ह्या अब्जाधीश कोंबडीचा ! रोजचा खर्च लाखात ...

आधुनिक जगात कोणाचे नशीब कधी फळफळेल याचा काहीच भरोसा नाही . तुम्ही आजपर्यंत माणसांचं नशीब फळफळलेलं ऐकलं असेल . पण प्राण्यांचं देखील नशीब बदलत हे आपण अक्षय कुमारच्या एन्टरटेनमेन्ट या सिनेमात बघितला आहे कि एक कुत्रा कसा अब्जाधीश बनतो . पण इथे प्रत्यक्ष आयुष्यात एक कोंबडी अब्जाधीश बनली आहे .

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील अब्जाधीश संपत्तीची मालकीण आहे . जगातल्या सर्व सुखसुविधांनी युक्त अशा एका बंगल्यात ती राहते . या बंगल्यात नोकर - चाकर ,महागड्या गाड्या ,स्वतःचा पर्सनल शेफ,सुरक्षा रक्षक  सर्व काही आहे . अगदी ऐशो आरामात ती कोंबडी जगते आहे . एखाद्या राजाप्रमाणे ती कोंबडी तीच आयुष्य जगत आहे . आलिशान गाड्यांसोबत त्या कोंबडीची एकूण संपत्ती १ कोटी डॉलर इतकी आहे . या अब्जाधीश कोंबडीचे नाव गिगो असे आहे .

जगातील पहिली अब्जाधीश कोंबडी


या कोंबडीचे मालक ब्रिटिश प्रकाशक माइल्स ब्लॅकवेल्हे ही व्यक्ती आहे . त्यांना एकपण संतान नव्हती . त्यांची बायको ही त्यांचा आधीच वारली होती . त्यामुळे माईल्स ब्लॅकवेल्सहे यांची गिगो हि अत्यंत प्रिय अशी पाळीव कोंबडी होती . त्यांचा गिगोवर खूप जीव होता . ते त्या कोंबडीला आपल्या मुलंबाळं प्रमाणे सांभाळत होते . त्यांना त्या गिगो कोम्बडीशिवाय जवळच म्हणावं असं कोणीच नव्हते . कोणी मित्र पण नव्हते आणि कोणी नातेवाईक पण नव्हते . ती कोंबडी त्यांच्यासाठी सर्वकाही होते . त्यामुळे त्यांनी त्यांची अब्जोकोटींची संपूर्ण संपत्ती गिगो कोंबडीच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता .

त्यानंतर त्यांनी तसे मृत्युपत्र तयार करून घेतले . त्यात त्यांनी थोडीफार संपत्ती गरीबांमध्ये दान केली आणि बाकी सर्व संपत्ती गिगो कोंबडीच्या नावावर करून टाकली . त्यामध्ये आलिशान बंगला,महागड्या गाड्या,त्यांच्या काही कंपन्या इत्यादी सर्व गोष्टी गिगो कोंबडीच्या नावावर केल्या आहेत . ते सर्व सांभाळण्यासाठी काही विश्वासू लोकांची नेमणूक केली आहे . ते लोक सर्व व्यवहार बघतात .

अशा प्रकारे गिगो कोंबडी ही जगातील पहिली अब्जाधीश कोंबडी ठरली आहे .