Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

सचिन सोबत क्रिकेट बोर्डाने ने केली १० नंबरची जर्सी सेवा निवृत्त !

sachin-Tendulkar-jersey-10-retired
सचिन म्हणजे क्रिकेटचा देवचं! भारतीय क्रिकेटचे एक सुवर्ण पान.  १९८८ सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या सचिन सोबत जोडली गेलेली त्याची एक ओळख म्हणजे त्याची १० नंबरची जर्सी. सचिनने जवळ पास २ दशक ह्या नंबरचा वापर करून आपल्या कारकिर्दीला आकार दिला.  १० क्रमांका व्यतिरिक्त त्याने ३३ आणि ९९ क्रमांकाची जर्सी देखील वापरली. मात्र, १० क्रमांकाची जर्सी आणि सचिन हे एक समीकरणच झाले होते.
नावेदित शार्दूल ठाकूरने वापर केलेला नंबर १० चा! 
सचिन ने निवृत्ती जाहीर केल्यावर फक्त खेळाडू शार्दूल ठाकूर हा श्रीलंकेविरुद्ध १० नंबरची जर्सी घालून उतारला होता पण त्यावर त्याला टीकेचे धनी व्हावे लागले होते.  ह्याच लोकांच्या तीव्र भावना व्यक्त बघता सचिनची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतल्याचे समजते.
सचिन नंतर अनेकांना हि जर्सी विराटने घालावी असे मनोमन वाटत होते पण विराटने त्याच्या लकी १८ नंबरची निवड केली आणि आज तो यशस्वी देखील आहे

मुंबई इंडियन कडून पण वापरलेली खेळतांना १० नंबरची जर्सी
सचिनने मार्च २०१२ मध्ये अखेरचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत खेळला होता आणि तेव्हा त्याने त्या जर्सीचा वापर केलेला. त्यानंतर सचिन मुंबई इंडियन्स साठी खेळतांना पण ती जर्सी वापरत असे. सचिन ने आयपील मधून पण जेव्हा निवृत्ती घेतली तेव्हा मुंबई इंडियन्स ने ती जर्सी निवृत्त केलेली. तोच कित्ता गिरवत आज क्रिकेट नियामक मंडळाने आंतरराष्ट्रीय स्थळावरून १० नंबरची जर्सी निवृत्त केली आहे. परंतु स्थानिक आणि 'अ' दर्जाच्या सामन्यात तिचा वापर केला जाऊ शकतो हे देखील स्पष्ट केले आहे.
एका निरीक्षणानुसार क्रिकेट मध्ये १९९९ च्या विश्वचषक सामान्यांपासून जर्सीवर नंबर देण्याची प्रथा आहे !