Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मनसे कार्यकर्त्यांनी उधळली संजय निरुपम ह्यांची सभा ...

मनसे कार्यकर्त्यांनी उधळली संजय निरुपम ह्यांची सभा .

काँग्रेस मुंबई शहर अध्यक्ष संजय निरुपम ह्यांची आज घाटकोपर मधील संजय गांधी नगर येथील सभा येथे आयोजित केलेली सभा मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उधळली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गेले काही दिवस मुंबईच्या फेरीवाल्यांवर संजय निरुपम आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बरीच शाब्दिक चकमक घडत होती, मालाड मध्ये सुशांत माळोदे ह्या मनसे सैनिकावर झालेल्या प्राण घातक हल्ल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना बरीच आक्रामक झाली असून त्याचीच परिणीती आजची सभा उधळवण्यात झाले असण्याची शक्यता आहे.
संजय निरुपम ह्यांची याचिका झाली आहे खारीज
संजय निरुपम ह्यांनी फेरीवाल्यांच्या समर्थानार्थ केलेल्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या नंतर त्यांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.
त्यातच काल मनसे सैनिकांनी ठाणे येथे परप्रांतीय मासे विक्रेत्यान्ची जी धुलाई केली त्यावर राबोडी पोलिसांनी आज कारवाई केली आहे. ह्या सर्व गोष्टी बघता मनसे आणि काँग्रेस मध्ये तणाव वाढत जाईल हीच शक्यता व्यक्त होत आहे . पुढे जाऊन मराठी माणसाच्या हक्काचा वाद नक्कीच चिघळला जाणार ह्यात शंका नाही .