Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

तुम्हाला माहित आहे का ? ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर का असते ‘X’ च चिन्ह ..! बघा

भारतात लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे हा आपल्या व्यवस्थेचा कणा आहे. जगातील सर्वाधिक लोक काम करत असलेली हि एक संस्था आहे. या रेल्वेबाबत तुम्हाला आम्ही आज एक खास गोष्ट सांगणार आहोत.जर तुम्ही कधी ट्रेनच्या शेवटच्या डब्याची सर्वात शेवटची  बाजू काळजी पूर्वक बघीतली तर तुम्हाला लक्ष्यात येईल कि मागच्या डब्याच्या मागे एक विशेष चिन्ह बनवलेले असते. बहुतेकदा आपण हे बघत नाही किंवा आपले त्या गोष्टी कडे लक्ष नसते पण हे चिन्ह खूप महत्वाचे आहे.

काय असते रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे ?

 
शेवटल्या डब्यावर असलेली ‘X’ ही खूण सफेद आणि लाल रंगात अथवा पिवळ्या रंगामध्ये असते. तसेच अनेक ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागे एक लाल कलरचा दिवा सुद्धा बहुतेकदा लावलेला पाहायला मिळतो. हा दिवा [लॅम्प] चालू बंद होत असतो. याआधीच्या अशा प्रकारच्या लॅम्पमध्ये तेलाचा वापर केला जात असे, मात्र हल्लीचे हे विजेवर चालणारे असतात.
 

नियमानुसार बंधनकारक असते प्रत्येक ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ही खूण असणं, शिवाय ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर एक बोर्ड सुद्धा लावलेल्या असतो ज्यावर LV हि अक्षरे लिहिलेली असतात. काळ्या किंवा सफेद रंगाचा वापर करून लिहिलेल्या LV या शब्दाचा ‘last vehicle’ आणि  ‘X’ चा अर्थ म्हणजे 'शेवटचा डब्बा'.

समजा ट्रेन पास झाली आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनच्या मागे हा बोर्ड दिसला नाही तर ह्याचा अर्थ पूर्ण ट्रेन पास झालेली नाही. असं काही आढळल्यास आपत्कालीन कारवाई सुरू केली जाते. जसे कि काही डबे हे ट्रेन पासून सुटून अथवा तोडून मोकळे केले जाण्याची शक्यता ह्यात असते.

आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवलेली हि माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल हि आशा करतो !