Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

पहाटेच का दिली जाते फाशीची शिक्षा ? - जाणून घ्या काही रोचक तथ्य !

 
कुठल्याही  आरोपीला कायद्याने मृत्युदंड तेव्हाच  दिला जातो, जेव्हा त्याने केलेला गुन्हा हा अतिशय क्रूर  अमानवी, भयंकर आणि अक्षम्य प्रकारचा असतो. वेगवेगळ्या देशांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत .  काही देशांमध्ये इंजेक्शनच्या सहाय्याने  शरीरात  हानिकारक विष  टोचून मृत्युदंड दिला जातो, तर काही देशांमध्ये विजेच्या खुर्चीवर बसवून  आरोपीला विजेचे  अतिशय तीव्र  झटके  दिले जाऊन त्याला देहदंड दिला जातो.

भारतामध्ये मृत्युदंड दिल्या गेलेल्या आरोपींना फाशी देण्याचा कायदा  आहे. ह्या मृत्युदंडाच्या  शिक्षांची अंमलबजावणी करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते.जेव्हा एखाद्या आरोपीला  मृत्युदंडाच्या शिक्षेची वेळ केव्हा निश्चित केली जावी याबद्दलचे नियमही ठरलेले आहेत, व त्यांचे काटेकोर पालन केले जाते. या नियमांप्रमाणे , फाशीची प्रक्रिया सूर्योदयाच्या जवळपास पार पाडली  जाते .

यासाठी अनेक करणे सांगितलेली आहेत . सर्वात पहिले आणि प्रमुख  कारण म्हणजे यात  आरोपीच्या भावनांचा विचार केला गेला आहे. फाशीचा दिवस उजाडल्यानंतर आरोपीला आपली शिक्षा भोगण्यासाठी फार काळ वाट बघायला लागू नये हे कारण आहे. फाशीच्या शिक्षेने आरोपीची मानसिक अवस्था जास्त बिघडू नये हे त्यामागचे प्रमुख कारण आहे .

कारागृहातील ज्या काही कारवाया आहेत या सर्व वेळेत पार पडाव्यात  या उद्देशाने देखील फाशीची वेळ सकाळच्या दरम्यानच निश्चित केली जाते. फाशीच्या शिक्षेसाठी कारागृहाच्या अधिकाऱ्यांना अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात . आरोपीला फाशी देण्याअगोदर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते .या प्रक्रियेची नोंद अनेक ठिकाणी रजिस्टरमध्ये करावी लागते . . आरोपीला फाशी दिल्यानंतर त्याच्या शवाची संपूर्ण वैद्यकीय तपासणी आणि पोस्ट मॉर्टेम केले जाते . हि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपीचे शव त्याचा नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी सोपवले जाते .  या संपूर्ण प्रक्रिया करता करता दिवस निघून जातो . म्हणून फाशीची शिक्षा सकाळी लवकर ठरवली जाते . त्यामुळे या सर्व प्रक्रिया वेळेत पार पाडता येतात .