Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

वाचा का असते नोटे वर फक्त गांधीजिंचेच चित्र ?

 
भारतात इतकी महान व्यक्ती होऊन गेले तरीपण भारतीय नोटेवर गांधीजींचाच फोटो का असतो ?भारतीय चलनातील कुठलीही नोट  बघा मग ती २० रुपया ची असो किंवा २००० रुपयाची असो त्यावर गांधीजींचा फोटो असतो . हे आपण लहानपणापासून बघत आलो आहोत . तर मग ह्याचे नेमके कारण काय?

भारतात इतकी महान व्यक्तिमत्व होऊन गेली जसे लालबहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल मग तरीसुद्धा भारतीय चलनावर गांधीजींचा फोटो का असतो ? जेव्हापासून आपण नोट बघायला लागलो किंवा जेव्हा आपल्याला समजायला लागले तेव्हापासून पडलेला प्रश्न आहे . म्हणूनच आम्ही तुम्हाला यामागचे काय गुपित आहे ते सांगणार आहोत .

भारतीय चलनाचे बारीक निरीक्षण केले तर काही गोष्टी या नक्कीच दिसून येतात . गांधीजींचा फोटो,काही चिन्हे जी निशाण दाखवतात,सिरीयल नंबर आणि स्टॅम्प बस एवढ्याच गोष्टी असतात . या छापलेल्या कागदाला पैशाचे रूप मिळवून देणारी गोष्ट म्हणजे गांधीजींचा फोटो.

या चित्रामुळे लोकांच्या तोंडात अनेक वाक्प्रचार यायला लागले जसे कि घ्यायला बापू आहे का तुझ्याकडे,जोपर्यंत आपल्याबरोबर बापू आहेत तोपर्यंत आपल्याला काळजी करण्याचे काही कारण नाही . बापू दाखवल्यावर सगळेच खुश होतात . या सर्वांमध्ये सर्वात जास्त त्रास देणारा एकाच प्रश्न आहे तो म्हणजे चलनांवर गांधीजींचाच फोटो का ?

या प्रश्नाने उत्तर देताना बरेच लोक म्हणतात कि भारताच्या स्वतंत्रलढ्यात गांधीजींचे सर्वात जास्त आणि मोठे योगदान होते म्हणून त्याचे चित्र चलनावर आहे . मग तसा बघायला गेलं तर देशासाठी बऱ्याच लोकांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले आहे . मग त्यांचे चित्र का नाही छापत नोटांवर ? या देशात इतके देव आणि महापुरुष होऊन गेले मग त्यांचे चित्र का नाही ? गांधीजींचाच का ? या प्रश्नाचे एकाच समाधानकारक उत्तर आहे . त्या उत्तराकडे कोणीच गंभीर रूपाने बघत नाही . बऱ्याच लोकांना हि गोष्ट माहितीसुद्धा नाही .

भारतीय चलनावर गांधीजीँचेच चित्र असण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भारतात आणि भारताबाहेरसुद्धा सगळ्यांचे परिचयाचे असलेले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाणारे भारतातील एकच व्यक्ती आहे ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. तुम्हाला शोधूनसुद्धा असा देश नाही सापडणार जो महात्मा गांधींना नाही ओळखत . भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारे आणि भारताला एक देश म्हणून ओळख मिळवून देणारे हे फक्त महात्मा गांधी होते . इतकेच नव्हे तर अहिंसेची ताकद दाखवून देणारे हे गांधीच होते .

भारतात अनेक जातीधर्माचे लोक राहतात . प्रत्येकाचे हिरो वेगवेगळे आहेत . त्यातसुद्धा त्यांचा प्रदेश सोडला तर इतर प्रदेशांमध्ये त्यांना कोणी ओळखत नाही . त्यामुळे प्रत्येक राज्यातील लोकांना वाटत कि नोटेवर आपल्या हिरोचा फोटो असावा पण तसे करणे शक्य नाही आहे .

त्याचे कारण म्हणजे देशाचे चलन म्हणून ते आपल्याला जगभरात पाठवायचे असते . त्यामुळे त्यात नेमकेपणा असला पाहिजे . त्याचे आधीपासूनच परिमाण नक्की केलेली असतात . त्यामुळे भारतीय चलनावर अशाच व्यक्तीचे चित्र असावे ज्याला सर्वमान्यता मिळाली आहे . त्याच्या नावावर कोणीपण आक्षेप घेऊ नये . या सर्व कारणांमुळे भारतीय चलनांवर गांधीजींचेच फोटो छापले जाते .

तुम्हाला खालील नोट आवडेल का ? कमेंट कराल