Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

पहिल्या पत्नीच्या सुनेला तिकीट मिळाले म्हणून खासदाराची ४ थी पत्नी झाली नाराज !गुजरात विधानसभा तिकीट वाटपात मोठे रंजक महाभारत घडले. याचे कारण कि सत्ताधारी भाजपा चे पंचमहाल येथील ७८ वर्षीय खासदार प्रभात चौहान यांनी एक दोन नाही तर तब्बल चार - चार वेळा लग्न केले आहे. खासदार इथेच थांबले नसून त्यांचा पोराबाळांचा गोतावळा पण ८ मुलामुलींचा आहे. गुजरात विधानसभेसाठी खासदार महाशयांनी आपल्या ४ थ्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती. घोगम्बा तालुका प्रमुख ३५ वर्षीय "रंगेश्वरी" या खासदारांच्या ४ थ्या पत्नी आहेत. 


परंतु भाजपा नेतृत्वाने रंगेश्वरी यांची उमेदवारी नाकारून सुमन चौहान यांना तिकीट दिले. सुमन चौहान या खासदार प्रभात चौहान यांची पहिली पत्नी रुपारी बेन यांच्या सुनबाई आहेत. आता ५० वर्षीय सुनबाई ला तिकीट मिळाल्यामुळे ३५ वर्षीय पत्नी नाराज झाल्या आणि बंडखोरीची भाषा सुद्धा करू लागल्या. इतकंच काय तर पत्नीव्रताला जगात खासदार महोदयांनी सुद्धा मुलगा प्रवीण आणि सुनबाई सुमन यांची लेखी तक्रार पक्ष नेतृत्वाकडे केली. उमेदवारी बदलली नाही तर खासदारकीचा राजीनामा देण्याची वल्गना सुद्धा करून टाकली. 


यामुळे शिस्तप्रिय आणि सुसंस्कृत म्हणविणाऱ्या भाजपा नेतृत्वाला सुद्धा पेच पडला. शेवटी अचानक पडद्यामागे घडामोडी झाल्या आणि वाद मिटले. म्हणजे उमेदवारी अर्ज भरत असताना सासू आणि सुनबाई एकाच व्यासपीठावर आल्या. इतकच काय तर ५० वर्षाच्या सुनेला ३५ वर्षाच्या सासूने आशीर्वाद सुद्धा दिले. पण चेहऱ्यावरची नाराजी काही लपून ठेवता आली नाही. आता येणारा निकालच सांगेल कि कालोल मधील जनतेने कोणाला आपला कौल दिला. पण एकूणच या प्रकाराने भाजपा ला एका वेगळ्याच राजकीय महाभारताला तोंड द्यावे लागले. कमीत कमी घरातच तिकीट देऊन घराणेशाही जपल्यामुळे मोठी बंडखोरी टळली असा आटा तरी दिसते आहे. लोकांमध्ये मात्र चर्चा जोरात रंगली आहे.