Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

शिकले सवरलेले लोक पण नाही जाणत HIV शी निगडित हे तथ्य, निदान तुम्ही वाचा !

एड्स हा एक असा आजार आहे जो आता सगळ्यांनाच माहिती आहे . हा एक जीवघेणा आजार आहे जो एचआयव्हीच्या इन्फेकशन ने होऊ शकतो . एचआयव्ही ला एड्सच्या स्थितीपर्यंत पोहोचायला वेळ लागतो . एचआयव्हीच्या बाबतीत एक दुर्दैवी गोष्ट ही आहे कि त्याची लक्षण लवकर दिसून येत नाही .  एक चांगली गोष्ट पण आहे कि लोक आता एड्सच्या बाबतीत खूप जागरूक झाले आहेत .

जवळजवळ सगळ्याच लोकांना माहिती आहे कि एचआयव्ही हा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे , दूषित रक्तामुळे , वापरलेल्या सुयांमुळे इत्यादींमुळे होतो . आम्ही एक येथे नमूद करून देतो कि एड्स हा स्वतः एक आजार नाही आहे . ते आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला फार कमी करून टाकतात . त्यामुळे आपल्याला स्वतः ला छोट्या मोठ्या आजारांपासून वाचवता येत नाही .वरील सर्व गोष्टी आपण नेहमीच ऐकत आलो आहोत . पण या आजाराशी निगडित काही अशी तथ्ये आहेत जी आपण जाणून घ्यायला पाहिजे .

लाखोंमध्ये मुलांची संख्या 

WHO च्या आकड्यांनुसार २०१५ मध्ये ३६. मिलियन लोक एचआयव्ही ने बाधित झाले आहेत . यामध्ये १.८ मिलियन तर लहान मुळेच होती . याचे संक्रमण गरीब आणि मध्यमवर्गीय लोकसंख्या असलेल्या देशांमधील लोकांमध्ये जास्त दिसून येते . २०१५ मध्ये एचआयव्हीचे २. १ मिलियन नवीन रुग्ण समोर आले होते .मृत्यूचा आकडा

आतापर्यंत जगभरात जवळजवळ ३५ मिलियन लोकांची एचआयव्ही मुले मृत्यू झाला आहे . यामध्ये पण १. १ मिलियन लोकांचा मृत्यू हा २०१५ मध्ये झाला आहे .एचआव्हीच्यादरम्यान लैंगिक संबंध 

एचआयव्ही बाधित जोडीदारासोबत लैंगिक संबंध बनवणं खूप धोकादायक असत . पण कंडोमच्या वापराने या धोक्याला कमी करता येऊ शकत . त्याला मुखमैथुन्य हा पण एक पर्याय असू शकतो . पण त्या दरम्यान तोंडात कुठे जखम नको . पण हे १००% सुरक्षित नाही आहे . त्यामुळे जोडीदाराला जवळ आणण्यासाठी दुसरा पर्याय वापरला पाहिजे .एचआयव्ही म्हणजे फक्त एड्स नाही 

जर तुम्हाला बऱ्याच वर्षांपासून एचआयव्ही असेल पण याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला एड्स पण झाला असेल . दैनंदिन जीवनात थोडे बदल करून आणि काही उपचार पद्धतीने एचआव्हीला नियंत्रणात आणता येऊ शकते . त्याचबरोबर अनेक प्रकारच्या इन्फेक्शन पासून आणि एड्स पासून बचाव केला जाऊ शकतो .या देशापासून झाली होती सुरुवात 

इबोला आणि अन्य धोकादायक वायरस सारखे एचआयव्ही पण पहिल्यांदा कुठूनतरी आला असेल ना . आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि एचआयव्ही हा सर्वात पहिले आफ्रिकेमध्ये आला होता . त्यानंतर १० वर्षात संपूर्ण जगात पसरला .

डासांनी नाही होत एचआयव्ही

डास आपल्या चावण्याने डेंग्यू , मलेरिया इत्यादी आजार पसरवू शकतो पण त्यांच्यात एचआयव्ही वायरस जल घुसला तर ते जास्त वेळ नाही टिकू शकत कितें इकडून तिकडे देवाणघेवाण करू शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे रक्त नाही पोहोचवत .लवकर येते म्हातारपण 

जे लोक एव्हरीची किंवा एड्सशी बाधित असतात त्यांच्यात म्हातारपणाचे संकेत लवकर दिसू लागतात . असे होते कारण कि हा वायरस बराच काळापर्यंत सूज धरून ठेवतो .मातेकडून बाळाकडे हस्तांतरण 

गर्भवती अवस्थेत किंवा स्तनपानाच्या दरम्यान एचआयव्ही वायरस मातेकडून बाळाला हस्तांतरित होण्याची १५ ते ४५% शक्यता असते . या शक्यतेला उपचारांद्वारे ५% पर्यंत आणता येऊ शकते .झाला निर्मूलन 

या बाबतीत सकारत्मक तथ्य असं आहे कि २०१५ ला क्युबा मध्ये एचआयव्ही चे माता ते बाळ हस्तांतरण समूळ नष्ट करण्यात आलं आहे . असं करणारा क्युबा हा देश जगातील पहिला देश बनला आहे.एचआयव्ही पासून टीबी

एचआयव्ही हा फक्त एड्स नाही तर टीबीसारख्या भयानक आजाराच्या धोक्याला वाढवून देतो . साल २०१३ च्या दरम्यान एचआयव्ही बाधित ३,६०,००० रुग्णांचा मृत्यू टीबीने झाला होता .