Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बापरे .. बघा जेव्हा लता दीदींना कोणीतरी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला !!लता मंगेशकर हे हिंदी सिनेमातील असं एक नाव आहे ज्याला कोणत्याच ओळखीची गरज नाहीये . आपला आवाज आणि गायकीने लोकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी लता मंगेशकर यांना भारताची स्वर कोकिळा असेदेखील म्हटले जाते . त्याकाळी लताजींनी गायिलेले गाणे आजसुद्धा तितकेच आवडीने ऐकले जातात. लोकांचे आजसुद्धा लताजींवर तितकेच प्रेम आहे . आज लतादीदी ८७ वर्षांच्या आहेत . लतादीदी या अनेक गोष्टींसाठी चर्चेत असायच्या . त्यांच्या शत्रूतेचे किस्से पण हिंदी सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे .


पण तुम्हाला कदाचित माहित नसेल पण लताजींना एकदा विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता . या गोष्टीचा खुलासा स्वतः लतादीदींनी त्यांच्या एका मुलाखतीत केला गेला होता . प्रसिद्ध लेखक पद्मा सचदेव ने आपले पुस्तक ऐसा कहासे लाऊ मे यामध्ये त्याचा उल्लेख केला होता . त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली होता . पद्मा सचदेवच्या पुस्तकात स्वतः लालाजींनी सांगितले आहे . हि घटना १९६२ ची होती . तेव्हा त्याचे वय फक्त ३३ वर्ष होते .

लताजींच्या म्हणण्याप्रमाणे एक दिवस जेव्हा त्या झोपेतून उठल्या तेव्हा त्यांच्या पोटात विचित्र त्रास व्हायला लागला . त्यानंतर त्यांना तीन ते चार वेळा उलट्या झाल्या ज्याचा रंग थोडा हिरवा होता . त्रास इतका जास्त होत होता कि त्या त्यांच्या जागेवरून पण हलू शकत नव्हत्या . त्यानंतर घरात हजर  असलेल्या सर्व लोकांनी डॉक्टर ला घरी बोलावून घेतले . तेव्हा तीन दिवस लतादीदी या मृत्यूशी झुंज देत होत्या . जवळजवळ दहा दिवसानंतर त्यांच्या तब्यतीत सुधारणा व्हायला लागली .

त्यानंतर गीतकार मजनू सुलतान पुरी यांनी लता मंगेशकर यांची खूप सेवा केली . लताजींना काहीही खायला द्यायच्या आधी मजनू सुलतान पुरी स्वतः चाखून बघत होते आणि नंतर लताजींना देत होते . डॉक्टरांनी सांगितलं कि त्यांना हळू विष दिले जात होते . या घटनेनंतर लालाजींच्या घरात स्वयंपाक करणारा आचारी कोणालाही न सांगता आणि पगार न घेताच तेथून पसार झाला . नंतर कळलं कि तो आचारी बऱ्याच कलाकारांच्या घरी आधी काम करत होता . या घटनेनंतर लताजींची बहीण आशा भोसले यांनी स्वतः स्वयंपाकाची जवाबदारी सांभाळली . पण आश्चर्याची गोष्ट हि होती कि शेवटपर्यंत नाही कळलं कि लताजींना विष देण्याचा प्रयत्न कोणी केला होता .