Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

जळू चिटकल्यावर काय कराल - सोपे उपाय !


पावसाळ्याच्या दिवसात पाण्यातून चालताना आपण काळजी घ्यायला कारण त्या पाण्यात जळू असू शकतो जळू हा दिसायला अळी सारखा आहे त्याचा आकार ५ ते ६ सेंटिमीटर आहे.
जळू नेमका करतो काय ?
जळू हा आपल्या नकळत पायाला  चिकटतो व कुठलीही नस पकडतो. मग तो आपल्या मुखातून दोन प्रकारची रसायने सोडतो पहिले रसायन म्हणजे ऍनेस्थेटिक. यामध्ये चावलेल्या ठिकाणी बधिरता येते
आणि दुसरे रसायन आहे अँटिकोएगुलांत या रसायनामुळे आपले रक्त पातळ होते.
त्यानंतर तो रक्त प्यायला लागतो जोपर्यंत त्याचे पोट भारत नाही तोपर्यंत तो पीत राहतो ते साधारण कमीतकमी २० मिनिटे ते ३ तास मग त्याचे पॉट भरल्यानंतर निघून जातो. जळू चावलेला काळात पण नाही कारण त्याने चावलेला भाग बधिर केलेला असतो

जळू जर चिकटलातर काय करायला पाहिजे. तो सहजासहजी निघत नाही कारण त्याला छोटे दात आहेत
चिकटलेल्या भागावर मीठ टाकल्यास तो लगेच निघून जातो त्यानंतर साबणाचे पाणी,लिंबूपाणी, शीतपेये यापैकी काहीही टाकला तरी तो निघून जातो

जळू लागल्यावर काय करायचे ?

जळू चिटकल्यानंतर रक्त थांबत नाही तरी तेथे हळद लावून घ्यावी,जखमेची मलमपट्टी करून घ्यावी. एकदा मलमपट्टी केल्यावर ती लवकर उघडू नये आणि खाज आली तरीही उघडू नये. दुसऱ्या दिवशी शरीरावर कुठल्याही भागावर लाल चट्टे आढळल्यास त्वरित डॉक्टर ला दाखवावे