Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

हैदराबाद मधील शास्त्रज्ञानं केला प्लॅस्टिक पासून इंधन निर्मितीचा यशस्वी प्रयोग

 

आज जगासमोर प्लॅस्टिकच्या ब्रह्मराक्षसाने अतिशय अक्राळविक्राळ स्वरूप धारण करून फार मोठी समस्या निर्माण केली आहे. आधुनिक जीवनशैली चा सगळ्यात मोठा विपरित परिणाम म्हणजे प्लॅस्टिक चा अनियंत्रित होणार वापर ! आज जगात प्रतिमाणशी जवळ २८ किलो प्लॅस्टिक प्रतिवर्षी वापरले जाते. अमेरिकेसारखे प्रगत देश तर प्रति माणशी १०९ किलो प्लॅस्टिकचा वापर दरवर्षी करत आहेत. प्लास्टिक चे विघटन होण्यास ५००- १००० वर्षाचा काळ लागतो ज्यामुळे प्लॅस्टिक चा कचरा ढीग बनून पडून आहे. याच बरोबर फार मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक चा कचरा समुद्रात जाऊन मिसळत आहे. असेच सुरु राहिले तर २०५० पर्यंत समुद्रात मासे कमी आणि प्लॅस्टिक जास्त अशी भयावह स्थिती निर्माण होईल. 

याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न जगातील अनेक शास्त्रज्ञ करत आहेत. भारतातील हैद्राबादमधल्या शास्त्रज्ञानं मृत प्लास्टिकपासून पेट्रोल निर्मिती करण्याचं तंत्र शोधून काढलंय. या तंत्रामुळं 500 किलो प्लास्टिकपासून जवळपास 400 लिटर इंधनाची निर्मिती होणार आहे. प्रयोग करताना सतीश यांनी मृत प्लास्टिकच्या कचऱ्याला इतर वस्तूंसोबत वॅक्यूम चेंबरमध्ये टाकलं आणि त्याला 350 ते 400 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम केलं. या प्रक्रियेत सर्वसाधारणपणे 500 किलोग्राम प्लास्टिकपासून 400 लिटर इंधन प्राप्त होतं. सतीश यांनी असा दावा सुद्धा केला आहे  कि प्लास्टिकपासून 200 ते 240 लीटर डिझेल, 80 ते 100 लिटर विमानासाठीचं इंधन, 60 लिटर पेट्रोल आणि 20 लिटर इतर इंधन तयार होऊ शकतं.

सतीश यांचा दावा आहे की 15 टन प्लास्टिकचं ते याचप्रकारे विघटन करतात. मात्र इतर तज्ज्ञांच्या मते सतीश करत असलेल्या प्रक्रियेत खूप उर्जा खर्च होते आणि या प्रकल्पामुळं मोठ्या प्रमाणावर हरित वायूंचं उत्सर्जन होतं.

यामुळेच सरकारी पातळीवर अश्या प्रकारच्या प्रयोगांना उत्तेजन आणि सहकार्य करण्याची गरज आहे जेणेकरून प्लॅस्टिक च्या कचऱ्याची समस्या सुटण्यास मदत मिळेलच पण त्याचबरोबर इंधन आयात करण्यास लागणारे देशाचे परकीय चलन सुद्धा वाचू शकेल.