Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा कोण आहे डॉनच्या गाण्यावर नाचणारा हा अंपायर ?

सोशल  मीडियावर म्हणजे व्हाट्सअप फेसबुक ट्विटर सगळीकडे  सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो तुम्हाला पोट दुखेपर्यंत हसवेल. क्रिकेट या खेळामध्ये सर्वात महत्त्वाची आणि मोठी जवाबदारी असते ती म्हणजे अंपायरची. योग्य आणि  अंयोग्य याची जाण ठेऊन योग्य तो निर्णय घेतो .  जर अंपायरच आपली जबाबदारी सोडून प्रेक्षकांसारखा आनंद लुटू लागले तर… होय … असाच प्रकार एका क्रिकेट सामन्यात पाहायला मिळाला जिथे अंपायरने गाणे लागताच ठेका धरला.


कोण आहे हा जाणून घेऊया या अंपायरविषयी

या अंपायरचे नाव आहे शंकर धोत्रे. त्याला गोट्या अंपायर असेही म्हणतात . कान्हूर मेसाई तालुका शिरूर या छोट्याशा खेडेगावातून मुंबईला नोकरी शोधण्यासाठी आला होता . लहानपणापासूनच नृत्याची त्याला आवड होती. लग्नाच्या वरातीत, मिरवणुकीत त्याच्या अप्रतिम नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा . क्रिकेटचीसुद्धा त्याला आवड होती . त्यामुळे पंचाचे काम करायचा.   एका सामन्यात पंचगीरी करत होता चौकार गेला संगीत वाजले.... महाशय विसरले कि आपण पंच आहोत... लागले नाचायला. प्रेक्षकांना याची गंमत वाटली . टाळ्यांचा कडकडाट झाला .
तिथूनच त्याला नवीन दिशा मिळाली . त्यानंतर गोट्या वेगवेगळ्या म्युझिकवर नाचायला लागला . नवींनवीन स्टेप करतो . आपल्या मिश्किल शैलीने गोट्या सर्वांना खळखळून हसवतो . त्यामुळे सध्या गोट्याची खूप मागणी वाढली आहे . गोट्याला टेनिस आणि क्रिकेट स्पर्धांसाठी खूप ऑफर येतात . एका दिवसासाठी आयोजक त्याला तीस ते चाळीस हजार रुपये द्यायला तयार असतात .

चला तर बघुया कसा झाला व्हिडीओ व्हायरल..

अलीकडेच भारताचे आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांनीही गोट्याचा विडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केला आहे . गेल्या सात वर्षात गोट्या प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही त्याचे अनुकरण कोणीही करू शकलेलं नाही .   यावरुन हे काम किती कौशल्याचे व अवघड आहे याची प्रचिती येते. गोट्याची अदाकारी परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ पाडते आहे...
लवकरच भारताबाहेरही मैदानांवर गोट्याचे नृत्य व लडीवाळ अदाकारींवर प्रेक्षक चिंब होताना आपल्याला पाहायला मिळेल..