Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

प्रसिद्ध अभिनेता शशी कपूर काळाच्या पडद्याआड !

 

दादा साहेब फाळके पुरस्कार विजेते आणि आपल्या खास हास्य आणि स्टाईल ने लोकांमध्ये प्रसिद्ध झालेले चित्रपट अभिनेता शशी कपूर ह्यांचे आज दीर्घ कालीन आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे पुतणे आणि अभिनेता ऋषी कपूर ह्यांनी दिल्लीमध्ये चालू असलेली आपली शूटिंग सोडून मुंबई कडे धाव घेतली आणि मीडियाला माहिती दिली. १८ मार्च १९३८ मध्ये शशी कपूर ह्यांचा कोलकाता येथे जन्म झाला होता. पृथ्वीराज कपूर ह्यांचे ते तृतीय चिरंजीव होते. फिल्म अभिनेता राज कपूर आणि शम्मी कपूर हे त्यांचे मोठे बंधू होते. भारतीय चित्रपट सृष्टीमधील सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना प्राप्त होता.

१९६१ मध्ये चित्रपट धर्मपुत्र द्वारे त्यांनी अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले होते. फ़िल्म 'चोरी मेरा काम', 'फांसी', 'शंकर दादा', 'दीवार', 'त्रिशूल', 'मुकद्दर', 'पाखंडी', 'कभी-कभी' और 'जब जब फूल खिले' अश्या ११६ चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलेला. ह्यातील ६१ चित्रपट हे त्यांच्या सोलो हिरोचे होते. अमिताभ बच्चन ह्यांच्या सोबत त्यांनी अभिनय केलेले चित्रपट विशेष गाजलेले आहे.
'मेरे पास माँ हे' हा त्यांचा सर्वात जास्त स्मरणात राहिलेले डायलॉग म्हणावा लागेल. त्यांची नृत्याची विशेष 

शैली देखील लोकांना भुरळ पडत असे. त्यांची मुलगी संजना कपूर आणि मुले करण आणि कुणाल कपूर  ह्यांनी देखील अभिनयाचे प्रयत्न केले होते. जेनिफर कँडल नावाच्या विदेशी महिलेशी त्यांचा विवाह झाला होता. मराठी फीड तर्फे शशी कपूर ह्यांना भावपूर्ण श्रद्धान्जली !