Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

एके काळचा सुपरस्टार पण एक छोटीशी चूक आणि फिल्म करियर संपले !


 

एक वेळ अशी होती जेव्हा हा हिरो स्क्रीन वर येयचा तर हिरोइन्स सुंदर दिसायचा. मुली तर ह्या हिरोसाठी वेड्याचं होत्या जणू. हा हिरो अभिनय देखील उत्कृष्ट करत असे. असे सर्व असुन पण अचानक हा कलाकार चित्रपट सृष्टी मधून हद्दपार झाला जणू. चित्रपट सृष्टी म्हणजे अशाश्वत जग हे परत सिद्धच झाले.

हरीश कुमार असे ह्या अभिनेत्याचे नाव असून करिष्मा कपूर सोबत प्रेमकैदी ह्या चित्रपटामधून त्याने आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली.  त्याच्या नंतर गोविंदा आणि हरीशने सोबत काही चित्रपट केले आणि त्यांची केमिस्ट्री लोकांना आवडू देखील लागली. अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग असून सुद्धा हरीश अचानक सिनेमासृष्टीतुन नाहीसा झाला.सध्या हरीश कुमार कुठे आहे ? चित्रपटांपासून हा दुरावा का ? अश्या कशी गोष्टी तुम्हाला सांगायला हि स्टोरी मराठी-फीड.इन ने केली आहे. चला तर मग एक दृश्यक्षेप टाकूया हरीश कुमार ह्यांच्यावर !

वयाच्या १५व्या वर्षीच हरीश कुमार ला प्रेमकैदी च्या मूळ तेलगू चित्रपटात हिरोचे काम मिळाले ! प्रेमकैदी प्रचंड हिट गेली. हाच चित्रपट हिंदी मध्ये करिष्मा कपूर सोबत त्याने केला हो देखील यशस्वी झाला .

 

त्यानंतर हरीशने संघर्ष करून अनेक चित्रपटांमध्ये काम मिळवले आणि यश देखील. राज कुमार आणि करिष्मा कपूर सोबत त्याने जवाब नावाचा चित्रपट देखील केला. पण तेव्हा त्याचा शिक्का जोरात चालू होता तो तेलगू चित्रपटांमध्ये.  तिथे त्याने एकसेएक हिट चित्रपट केले.

गोविंदा सोबतचा कुली न १ ठरला लँडमार्क !
 
 
ज्या वेळेस गोविंदाचे स्टार जोरात होते तेव्हाच हरीशला त्याच्या सोबत कुली नंबर १ करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचे हरीशने सोने केले. पुढे डेव्हिड धवन ने त्याला ऑन्टी नंबर १ मध्ये पण संधी दिली.

हरीश कुमार ला चित्रपटातील योगदानासाठी 'आंध्र केसरी' पुरस्कार आंध्र प्रदेश चे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय एन.टी. रामा राव ह्यांच्या हस्ते मिळाला होता । हरीश कुमार हा असा अभिनेता होता जो एंक भाषांनमध्ये यशस्वी झालेला पण ह्या एका कारणामुळे त्याचे करियर संपले, ते कारण म्हणजे त्याचे प्रमाणाबाहेर वाढत चालेले वजन ! खाण्याच्या शौकीन हरीश कुमार ह्यांना आपले वजन नियंत्रणात ठेवण्यात अपयश आले आणि त्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी जणू त्यांच्या कडे पाठच फिरवली.
२००१ साली आलेली इंतेकाम हि त्यांची शेवटची फिल्म ठरली आणि एका चॉकलेट बॉय कडे चित्रपट सृष्टीने पाठ फिरवली ..