Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

जिने तोडले २२ वर्ष जुने लग्न तिच्या सोबतच घेणार सात फेरे !

 
२००५-०६ च्या दरम्यान आशिक बनाया आपने आणि तेरा सुरूर सारख्या गाण्यांद्वारे गायक संगीत दिग्दर्शक कलाकार आणि प्रोड्युसर म्हणून हिमेश रेशमिया यांनी  चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते . त्या काळात त्यांच्या वेगळ्या अंदाजाचे सर्वच चाहते होते . याच कारणामुळे हिमेशने एक्टिंगमध्ये स्वतः चा नशीब अजमावला होता . तो भाग वेगळा आहे कि त्यांना पाहिजे तस यश नाही मिळालं .

गेल्या काही वर्षात हिमेशचं लूक बरंच बदललं आहे . गेल्या काही वर्षांपासून ते सर्वांच्या चर्चेचा विषय बनले आहे . त्यांच्या कुठल्या गाण्यामुळे नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडलेल्या घटनांमुळे . काही महिन्यापूर्वीच त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला . या घटस्फोटाचे खरे कारण त्यांची प्रेयसी आहे असे सांगितले जात आहे . मिळालेल्या बातमीनुसार असे समजले आहे कि हिमेश आपल्या प्रेयसीबरोबर लग्न करण्याच्या तयारीत आहे . तर मग कधी होईल हिमेशचं लग्न? कोण आहे ती प्रेयसी ? चला मग जाणून घेऊया संपूर्ण कहाणी ......

२२ वर्षांचं नातं 
हे ऐकल्यावर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल कि हिमेश रेशमिया आणि कोमलचा लग्न १९९५ साली म्हणजे २२ वर्षांपूर्वी झाले होते . कोमल ने स्वतःला चित्रपटसृष्टीपासून नेहमीच दूर ठेवले होते .

त्याचा आहे एक मुलगा 
हिमेश आणि कोमल ला एक मुलगा पण आहे त्याचे नाव स्वयं असे आहे . हिमेश आपल्या मुलाला पण मीडिया पासून लांबच ठेवतो . मिळालेल्या बातमीनुसार असे समजले आहे कि स्वयं हिमेश आणि कोमल या दोघांच्या जॉईंट कस्टडी मध्ये राहील .

जूनमध्ये मिळाली घटस्फोटाला मंजुरी 
हिमेशच्या वैवाहिक जीवनात काही काळापासून अडचणी येत होत्या . हिमेश डिसेंबर २०१६ ला आपल्या पत्नीपासून वेगळे झाले होते . ६ जून २०१७ ला मुंबई हायकोर्टाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला होता .

करतात एकमेकांचा सन्मान 
घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर हिमेश आणि कोमलने मीडिया ला हेच सांगितलं कि त्यांच्यात काही ताळमेळ नव्हता . ते अजुनपण एकमेकांचा सन्मान करतात आणि नेहमी एक परिवाराचा भाग बनून राहतील .

ही आहे हिमेशची प्रेयसी 
मीडियाच्या बातमीप्रमाणे टीव्ही कलाकार सोनिया कपूर हीच हिमेश आणि त्यांच्या पत्नीचे वेगळे होण्याचे कारण आहे . सोनियाने सती,रीमिक्स,कैसा ये प्यार है या सारख्या मालिंकांमध्ये काम केली आहेत.

इतक्या वर्षांपासून आहे त्यांचा नातं 
हिमेश आणि सोनिया नेहमीच बऱ्याचशा  इव्हेंटमध्ये सोबत दिसतात .  हे दोघे एकमेकांना गेल्या १० वर्षांपासून डेट करत आहे .

सोनिया ते कारण नाही 
हिमेशची पत्नी कोमलने मीडियाला सांगितले आहे कि आमच्या घटस्फोटाला कोणीही जवाबदार नाहीये . सोनिया त्यांच्या परिवारातील एक सदस्यासारखी आहे . त्यांचा संपूर्ण परिवार सोनियाला पसंत करतात .

सोनियाचे  काय म्हणणे आहे 
हिमेशच्या घटस्फोटाच्या बाबतीत सोनिया म्हणाली कि हिमेशचा परिवार हा त्यांचा परिवार आहे आणि माझा सगळ्यांवरच खूप प्रेम आहे .

राहत आहेत सोबत 
मिळालेल्या बातमीनुसार असे समजले आहे कि हिमेश आणि सोनिया घटस्फोटाच्या आधीपासूनच एकत्र राहायला लागले होते . पण हिमेशने यावर काहीच उत्तर दिलेले नाही .

नेहमी असते हिमेशबरोबर 
रिऍलिटीशोच्या शूटिंगच्या दरम्यान नेहमी हिमेशबरोबर असते . रेकॉर्डिंग,स्टेजशो आणि इव्हेंटमध्ये पण ती नेहमी हिमेशबरोबर असते .

करणार आहेत लग्न 
मिळालेल्या बातमीनुसार कदाचित पुढील वर्षी हिमेश दुसरा लग्न करू शकतात . पण सध्यातरी हिमेश कामामध्ये व्यस्त आहे . हिमेश आणि सोनिया पुढच्या  वर्षी लग्नाचे प्लांनिंग करत आहे . हिमेशच्या परिवाराला सोनिया पसंत आहे .

दिले नाही अजून काही उत्तर 
याबाबतीत हिमेशने अजून काही उत्तर दिलेले नाही . काही दिवसांपूर्वी दुसऱ्या लग्नाविषयी विचारल्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिल होत .

मुलाला पण आहे पसंत 
सोनियाची हिमेशबरोबरच स्वयं सोबत पण चांगली गट्टी जमली आहे . स्वयं नेहमी हिमेश आणि सोनियाला भेटायला जातो .