Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

वेळ ठरली ! चंद्रावर पडणार भारतीय ठसा,चंद्रयान-२ ची तयारी पूर्ण ...

पृथ्वीचा उपग्रह, आकाशात दिसणारा एक असा तारा ज्याच्यावर असंख्य कविता,कथा आपण रचल्या आहे त्याच चंद्रावर आता भारतीय पाऊल पडायची तयारी चालू आहे. १९७० च्या अमेरिकेच्या यशस्वी चंद्रयाना नंतर २०१३ मध्ये चीनच्या युटू चंद्रयांनाने चंद्रावर पाऊल पडले.

इसरो ने मार्च २०१८ मध्ये चंद्रयान २ ची तयारी सुरु केली आहे, त्यासाठी सर्व तयारी त्यांची जोरात सुरु आहे. चंद्रयान १ च्या अभियानामध्ये आलेल्या अडचणींशी सामना करून आता इसरोने सर्व समस्यांवर तोडगा काढत चंद्रयान ह्या आपल्या अति महत्त्वाकांक्षी मिशनची घोषणा केली आहे. भारतीय सरकार देखील मोठ्या अपेक्षेने हा प्रोजेक्ट कडे बघत आहे आणि जर भारतीय यान चंद्रावर पोहोचले तर नक्कीच त्याचे जागतिक पातळीवर अनेक सकारात्मक परिणाम होतील.

चंद्रयान १ हे अभियान २००८ मध्ये श्रीहरीकोटा वरून जेव्हा प्रक्षेपित केलेले तेव्हा त्याचा स्फोट झालेला त्याला साधारण ८३ मिलियन डॉलर म्हणजे ५०० कोटी रुपये लागलेले. इसरोने नंतर एक छोटे यान लुनार ऑर्बिट मध्ये पाठवले तेव्हा भारताने चुंबकीय पाणी शोधलेले.

साधारण हि मिशन पूर्ण होयला १४ दिवस लागतील असे इसरोचे म्हणणे आहे. चंद्रयान २ मिशन शिवाय आदित्य नावाचे सूर्याचे तसेच इतर ५ उपग्रह सोडण्याचा देखील २०१८ मध्ये योजना आहे ! एक्स्पोसॅट नावाचे रेडिएशनचा अभ्यास करणारे उपग्रह देखील सोडले जाणार आहे.