Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मनसेने केली सर्जिकल स्ट्राईक ! काँग्रेस कार्यालय फोडले

mumbai-congress-attack-by-mns 

गेल्या काही दिवसानापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम ह्यांच्या मधेच बरेच युद्ध रंगलेले आपण पहिले. त्याचा परिणाम म्हणून कि काय मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयावर शुक्रवारी सकाळी हल्ला झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस कार्यालयावर झालेल्या या हल्ल्याची सर्व जबाबदारी स्वीकारली. मनसेने नेते आणि प्रवक्ते माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन हल्ल्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वीकारत आहे असे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..इट का जवाब पथ्थर से मिलेगा.. असे टि्वट त्यांनी  त्यांच्या अधिकृत ट्विटर प्रोफाईल वरून केले आहे. 
मनसेने केलेल्या हल्ल्यामध्ये केबिनच्या सर्व काचा संपूर्ण पणे फोडल्या गेल्याचे स्पष्ट दिसत आहे आणि त्या सोबतच काही सामानाची तोडफोड तरी केली आहे. सुरुवातीला हा हल्ला कोणी केला ह्या बाबत नक्कीच संभ्रम निर्माण झाला होता पण संदीप देशपांडे ह्यांच्या ट्विटने सर्व स्पष्ट झाले आहे.
१५ दिवसांपासून चालू आहे खडाजंगी !

काँग्रेस मुंबई शहर अध्यक्ष संजय निरुपम ह्यांची घाटकोपर मधील संजय गांधी नगर येथील सभा मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उधळली होती.  गेले काही दिवस मुंबईच्या फेरीवाल्यांवर संजय निरुपम आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बरीच शाब्दिक चकमक घडत होती, मालाड मध्ये सुशांत माळोदे ह्या मनसे सैनिकावर झालेल्या प्राण घातक हल्ल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना बरीच आक्रामक झाली असून त्याचीच परिणीती हि संजय निरुपम ह्यांची सभा उधळवण्यात झाली आणि आज काँग्रेसचे सीएसटी येथील करायला फोडण्यात आले.