Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

चला पटापट मतदान करा ! महाराष्ट्राचा भावी सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला?महाराष्ट्र म्हणजे ११ कोटी लोकसंख्या असलेले एक विशाल राज्य. २८८ आमदार आणि ४८ खासदार ह्यांचे अधिपत्य असलेला एक विशाल प्रदेश. अनेक नेते आले अनेक गेले पण महाराष्ट्राची घौडदौड चालूच आहे. १८ मुख्यमंत्री बघितलेल्या ह्या राज्याला आता कोणता लोकप्रिय मुख्यमंत्री मिळाला पाहिजे त्याच्या साठीच आहे हा पोल. तुमचे मत आणि कॉमेंट नक्कीच स्वागतार्ह्य आहे. भाजप,शिवसेना,मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ह्या प्रमुख पक्षांसोबतच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि आरपीआय ह्या पक्षांमधून काही मोजकी नावे पोल साठी घेण्यात आली आहे.
नारायण राणे,अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण ह्या माजी आणि देवेंद्र फडवणीस ह्या आजी मुख्यमंत्र्यांचा समावेश ह्या यादी मध्ये आहेतच. त्या शिवाय राज साहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे ह्या दोन कधीहि निवडणूक न लढवलेल्या नेत्यांचा देखील ह्यात समावेश आहे.
पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे ह्या दोन महिला नेत्यांच्या पण ह्या यादीत समावेश आहे, विशेष म्हणजे महाराष्ट्राने अजून पण महिला मुख्यमंत्री बघितली नाही आहे. रामदास आठवले साहेब हे सध्या केंद्रात मंत्री आहे तर अशोक चव्हाण हे खासदार आहेत.तर चला तयार व्हा मतदान करायला आणि सांगा पाहू तुमचे मत कोणाला आहे ?