Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मला माफ करा मी संपूर्ण उद्ध्वस्त झालो आहे ! - स्टीव्ह स्मिथ पत्रकार परिषद


बॉल टॅम्परिंगच्या मुद्द्यावरून औस्ट्रेलिया संघाला संपूर्ण जगाने धारेवर धरले आहे. ह्यावर एक भावनिक प्रेस कॉन्फरन्स घेतांना कर्णधार स्मिथ ने खालील संदेश बोलून संपूर्ण जवाबदारी स्वीकारली आहे ...

Smith breaks down during emotional press conference

माझ्या सर्व टीम मधील सहकाऱ्यांनो,क्रिकेटमधील जगभरातील चाहत्यांनो आणि सर्व निराश आणि चिडलेल्या आस्ट्रेलियाच्या नागरिकांनो, मला माफ करा !
जे केपटाऊन मध्ये घडले त्यावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने प्रकाश टाकला आहेच. आज मला हे स्पष्ट करायचे आहे कि ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार म्हणून मी सर्व जवाबदारी स्वीकारत आहे. मी खूप गंभीर अपराध केला आहे आणि त्याचे परिणाम मला माहित आहे. तो प्रकार नेतृत्वाचा पराभव होता.
[स्मिथचा आवाज भरून आला ] मी माझ्या चुकांची भरपाई करण्यास काहीही करायला तयार आहे. ह्यातून काही चांगले घडायचे असेल तर ते असावे घडावे कि ज्याने दुसऱ्यांना धडा मिळाला पाहिजे आणि ज्यात मी पण बदललो गेलो पाहिजे
मला माझ्या आयुष्यभर ह्या घटनेचा पस्तावा असेल. मी आशा करतो येत्या भविष्य काळात मी क्षमेचा पात्र असेल आणि माझा सन्मान मला परत मिळेल माझ्या देशाचे नेतृत्व करणे खूप मोठ्या अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट होती, क्रिकेट हा जगातील सर्वात महान खेळ आहे. हेच माझे जीवन आहे आणि मी आशा करतो ते परत असेल.
मला माफ करा आणि मी संपूर्ण उद्ध्वस्त झालो आहे !
त्यानंतर प्रश्न उत्तर सुरु झाले ज्यात त्याने परत माफी मागून आपले म्हणणे मांडले आहे !