Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

हे उपाय आणि उंदीर होणार कायमचे छू मंतर ...


उंदीर म्हणजे संस्कृतमध्ये मूषक ! जो प्राणी नाशिक ते न्यूयॉर्क आणि बुलढाणा ते बर्लिन सर्वत्र आढळतो ...
उंदीर आपले किमती सामानाची नासधूस करतात.  उंदराच्या त्रासाने हैरान झालेले असतात.  खरे तर उंदीर म्हणजे भगवान गणपतीचे वाहन मानले गेले आहे पण जेव्हा ते माणसाला त्रास देतात तेव्हा त्यांना घराबाहेर काढणेच योग्य असते कारण अनेक आजारांना निमंत्रण देखील ते देत असतात . चला पाहूया उंदरांना घराबाहेर काढण्याचा काही रामबाण उपाय.

१ पुदिना : पुदीना उंदरांच्या मध्ये भीती निर्माण करते. पुदीन्याची पाने किंवा फुले उंदीरांच्या बिळामध्ये टाकावी किंवा जर घरात उंदीर असतील तर घरात जेथे जेथे उंदरांचा वावर असतो तेथे पुदीना टाकावा याच्या वासामुळे उंदीर घराबाहेर पळून जातील.


२ लाल तिखट : जेथून उंदीर घरामध्ये येतात जातात त्यांचा या मार्गात लाल मिरची पावडर टाकावी. असे केल्यामुळे उंदीर घरात पुन्हा येताना दिसणार नाहीत.

३ तेज पत्ता म्हणजे मसाल्याचे पान : पुदिन्या प्रमाणेच तेज पत्ता पण उंदीर घराबाहेर काढण्यास मदत करते.

४ मानवी केस : उंदरांना घराबाहेर काढण्याचा सर्वात सोप्पा उपाय आहे मानवाचे केस. तुम्हाला आश्चर्य वाटेल उंदीर पळवण्याचा सर्वात सोप्पा उपाय आहे कारण माणसाच्या केसांमुळे उंदीर पळून जातात. उंदीर हा प्राणी केस आणि त्याचा गुंता ह्यात अडकून स्वतःला हानी पोहोचवतो म्हणून ते त्याला घाबरतात

५ उंदरांच्या त्रासा पासून सुटका मिळवण्यासाठी पेपरमिंट एक चांगला उपाय आहे. पिपरमिंटचा वास उंदरांना बिलकुल आवडत नाही. कापसाचे तुकडे घेऊन ते पेपरमिंट मध्ये बुडवा. आता हे तुकडे उंदीर जेथे दिसतात किंवा जेथे येण्याची शक्यता असते तेथे ठेवा. या वासामुळे उंदराचा श्वास कोंडला जातो. त्यामुळे ते घराबाहेर जातात किंवा श्वास घुतल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो.