Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी गांभीर्याने घेत नाही - सामना

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्यावर टीका केल्यावर आणि शिवसेनेला गांडूळ संभोधल्यावर अजित पवार ह्यांच्यावर चांगलीच कंबक्ती आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे .


१ अजित पवार यांचे राजकारण आता बारामतीपुरतेसुद्धा उरलेले नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी अजित पवारांना जवळजवळ माती खायला लावलीच होती.
२ महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवारांची पत ती काय, पण तरीही त्यांच्या जिभेचा गांडूळ अधूनमधून वळवळत असतो.
३ त्यांना जो काही मानसन्मान आतापर्यंत मिळाला तो त्यांच्या आदरणीय काकांमुळे. पण काकांनी संपूर्ण संधी व पाठबळ देऊनही अजित पवारांना नेतृत्व उभे करता आले नाही. कारण त्यांचे तोंड व जीभ म्हणजे भ्रष्ट गटार आहे व येणाऱ्या-जाणाऱ्यांवर त्यांच्या गटारी तोंडाने थुंकून ते घाण करीत असतात.
४ काकांनी पन्नास वर्षांत कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीत गमावल्यामुळेच शरद पवारांना ७५ व्या वर्षीसुद्धा पक्षबांधणीसाठी वणवण करावी लागत आहे.
५. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असे म्हणावे लागेल. जो गुन्हा छिंदमने केला तोच गुन्हा मंत्रीपदावर असताना तुम्ही तेव्हा केला.
६.  जेव्हा तुम्ही सलग १५ वर्षे सत्तेत खुर्च्या उबवीत होता तेव्हा तुम्ही महाराष्ट्रहिताचे काय दिवे लावले?
७ अजित पवारांसह त्यांच्या भ्रष्ट मित्रमंडळाची जागा भुजबळांबरोबर तुरुंगातच आहे. त्या भयानेच भाजपचे ‘बूट’ चाटीत हे महाशय शिवसेनेवर हल्ला करीत आहेत.

शिवसेनेचा आजचा झणझणीत अग्रलेख म्हणजे २०१९ च्या रणसंग्रामाचे बिगुलच म्हणायला हरकत नाही